शासनाच्या पोषण आहारामध्ये नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश

शासनाच्या पोषण आहारामध्ये नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश

शासनाच्या पोषण आहारामध्ये नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश 

पुणे, ता. १९ - अंगणवाडीतील बालकांसह गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देत नवीन आणि रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. 

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री तटकरे यांनी स्वतः पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली. 

बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories