एनसीईआरटी अभ्यासक्रमाची पु्स्तके न वापरल्या प्रकरणी महापालिका प्रशासनाची चऱ्होलीतील रेड क्लिफ शाळेला नोटिस
Jun 19 2026
12
एनसीईआरटी अभ्यासक्रमाची पु्स्तके न वापरल्या प्रकरणी महापालिका प्रशासनाची चऱ्होलीतील रेड क्लिफ शाळेला नोटिस
पिंपरी, ता. १९ - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ठरविलेल्या (NCERT) अभ्यासक्रमाची पु्स्तके न वापरता अन्य प्रकाशनाची पुस्तके वापरल्याबद्दल चऱ्होली-चोविसावाडी येथील रेड क्लिफ शाळेला महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी संगीता बांगर यांनी नोटिस बजावली आहे.
याबाबत, प्रशासनाने म्हटले आहे की, १५ जून २०२६ रोजी रेड क्लिफ शाळेत समक्ष भेट देवून तपासणी केली असता, ही शाळा R-Smile या प्रकाशनाची शैक्षणिक पाठ्यपुस्तके व इतर शेक्षणिक साहित्य पालकांना विक्री करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे, सदर साहित्य वाटप वर्गखोली सील केलेली आहे.
यापूर्वी, शाळेमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची पालकांना व विद्यार्थ्यांना सक्ती न करण्याबाबत तसेच एनसीइआरटी पाठ्यपुस्तके वापरण्याबाबत शासनाला कळवण्यात आले होते. तरीही शाळा खाजगी प्रकाशनाची पाठ्यपुस्तके शाळेत वापरत असल्याचे दिसून येत आहे. सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असून यावरुन शाळा वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे, शाळेमध्ये एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमाचा वापर सुरु करावा. याबाबत समक्ष लेखी अहवाल ३ दिवसांत कार्यालयास सादर करावा. आपण शाळेमध्ये शासनमान्य एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांचा वापर न केल्यास शाळेवर विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनिमय २००९ कायद्यानुसार कारवाई केली जाईल याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागाने नोटिशीत स्पष्ट केले आहे.
- Pune schools, textbook violation, education rules compliance, admission and curriculum issue
- NCERT books, private publication books, school inspection
- R-Smile प्रकाशन, शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके, पालक तक्रार
- शिक्षण विभाग, संगीता बांगर
- चऱ्होली, चोविसावाडी, पिंपरी चिंचवड महापालिका
- एनसीईआरटी पुस्तके, रेड क्लिफ शाळा,