'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' २८ जूनला होणार, दोन लाखांहून अधिक शिक्षक परीक्षा देणार

'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' २८ जूनला होणार, दोन लाखांहून अधिक शिक्षक परीक्षा देणार

 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' २८ जूनला होणार, दोन लाखांहून अधिक शिक्षक परीक्षा देणार 

पुणे, ता. १९ -  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६' (टीईटी) यंदा २८ जूनला होणार आहे. राज्यातील तब्बल २ लाख २६ हजार २६३ शिक्षक परीक्षा देणार आहेत. राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण एक हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे आणि आयुक्त महेश चोथे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसह नियमित परीक्षार्थी, अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थीनी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १ हजार ७२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. टीईटी परीक्षेतील 'पेपर एक'साठी ७०१ केंद्रे, तर 'पेपर दोन'साठी १०२८ केंद्र आहेत. या ठिकाणी वर्ग खोल्या, प्रवेश, लॉबी, केंद्र संचालक कक्ष.... अशा एकूण १८ हजार ७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसह नियमित परीक्षार्थी, अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थीनी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण सहा लाख १२५ अर्ज केले आहेत. यात सात हजार १३९ दिव्यांगांचा समावेश आहे.

 'टीईटी- २०२६'च्या परीक्षेची प्रवेशपत्र परीक्षार्थीच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध केली असून ती प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावीत. वेळेवर धावपळ टाळण्यासाठी परीक्षा केंद्राचा पत्ता अगोदरच माहिती करून घ्यावा, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories