सारसबाग व पेशवे पार्क येथील विकासकामांचा महापालिका आयुक्तांकडून आढावा

सारसबाग व पेशवे पार्क येथील विकासकामांचा महापालिका आयुक्तांकडून आढावा

सारसबाग व पेशवे पार्क येथील विकासकामांचा महापालिका आयुक्तांकडून आढावा

पिंपरी, ता. १९ - गुरुवारी (दिनांक १८ जून) महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सारसबाग व पेशवे पार्क या उद्यानांची पाहणी केली. सारसबाग येथे मंदिरात प्रवेश करण्यासाठी करावयाच्या काचेच्या पुलाची जागेची पाहणी केली तसेच सारसबाग येथे नव्याने काही विकासकामे करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली. 

पेशवे पार्क येथे नवीन संकल्पनांवर आधारित उद्यान तयार करणे तसेच उर्जा पार्कची दुरुस्ती करणे याबाबत चर्चा करण्यात आली. पेशवे पार्क येथील घनकचरा विभागाच्या बंद प्रकल्पाची जागा उद्यान विभागाच्या ताब्यात द्यावी अथवा नवीन प्रकल्प करताना कचऱ्यापासून पसरणाऱ्या दुर्गंधीचा उद्यानात फिरावयास येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घनकचरा विभागाने घ्यावी याबाबत चर्चा झाली.

सदर पाहणी दरम्यान पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. २७ मधील नगरसवेक धीरज घाटे, स्मिता वस्ते, लता गौडा आणि महेश आवळे उपस्थित होते तसेच विभागाकडील सह महापालिका आयुक्त डॉ. अशोक घोरपडे,  कार्यकारी अभियंता (स्थापत्य) राहुल साळुंके, उद्यान अधिक्षक संतोषकुमार कांबळे,  उप अभियंता (विद्युत) भाग्यश्री चौगुले उपस्थित होते.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories