भोसरीत सरपणासाठी गेलेल्या व्यक्तीवर हल्ला; मोबाइल व रोकड लुटल्याची तक्रार

भोसरीत सरपणासाठी गेलेल्या व्यक्तीवर हल्ला; मोबाइल व रोकड लुटल्याची तक्रार

भोसरी | 13 सप्टेंबर 2026 : पुणे-नाशिक महामार्गावरील धावडेवस्ती परिसरात सरपणासाठी गेलेल्या व्यक्तीवर दोघांनी हल्ला करून त्याचा मोबाइल आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

राजेश्वर उत्तम मोहिते (वय 42, रा. महादेवनगर, भोसरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सम्राट इंडियन पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या मैदानात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार सरपणाचा व्यवसाय करतात. सरपण विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने ते आपल्या कुंटुंबीयासह मोकळ्या जागेत गेले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आल्या.

दोघांनी तक्रारदारास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड मारून जखमी केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर तक्रारदाराच्या खिशातील सुमारे 1,500 रुपये किमतीचा मोबाइल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर दोघे आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले. भोसरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6), 3(5) तसेच संबंधित कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पोडवी पाटील करीत आहेत. आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories