बंदी आदेशाचे उल्लंघन करुन गुप्ती घेऊन फिरणाऱ्या युवकास अटक
Feb 17 2026
50
बंदी आदेशाचे उल्लंघन करुन गुप्ती घेऊन फिरणाऱ्या युवकास अटक
पिंपरी, ता. १७ - बंदी आदेशाचे उल्लंघन करुन लोखंडी गुप्ती व मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या २० वर्षीय युवकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पोलिसांनी सोमवारी (ता. १६) सिद्धबेट चौक (ता. खेड) येथून अटक केली आहे.
या युवकाविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ती बाळगणाऱ्या युवकाचे नाव रोहन अनिल दोडे (वय २० वर्षे, रा. गजानन महाराज मंदीर जवळ, देहुफाटा, आळंदी देवाची ता. खेड) असे आहे. दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ चे १७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे बंदी आदेश असताना आरोपी सदर बंदी आदेशाचे उल्लंघन करुन ५००/- रुपये किंमतीची लोखंडी गुप्ती व ३०,०००/- रुपये किंमतीची मोटारसायकल घेऊन तो वावरत होता.
गुंडा विरोधी पथकाने आरोपीला अटक करुन त्याच्याजवळील वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------