काळेवाडीमध्ये अडीच लाखांचा गांजा जप्त, तिघांना अटक

पिंपरी, ता. २६ - काळेवाडीमध्ये एकूण २ लाख ६५ हजार ३५० रुपयांचा निव्व्ळ गांजा व हायड्रोपोनिक गांजा बुधवारी (ता. २५) पहाटे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट - २ च्या पथकाने जप्त केला आहे. हा गांजा बाळगणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विक्रीसाठी हा गांजा बेकायदेशीररित्या बाळगला होता. आरोपींपैकी एकाकडे ९३ ग्रॅम वजनाचा व ४ हजार ६५०/- किंमतीचा निव्वळ गांजा, दुसऱ्याकडे  ३.३० ग्रॅम वजनाचा व ३० हजार ३००/- किंमतीचा हायड्रोपोनिक गांजा आणि तिसऱ्याकडे २३.४० ग्रॅम वजनाचा २ लाख ३० हजार ४००/-  किंमतीचा हायड्रोपोनिक गांजा सापडला. हा  एकूण ९३ ग्रॅम गांजा व २६.७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा २ लाख ६५ हजार ३५०/- किंमतीचा आहे. 

पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरोधात  काळेवाडी पोलीस ठाण्यात  एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब)(ii)(अ) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींची नावे - 

१) प्रतिक राकेश खैरनार वय २७ वर्षे रा. रॉयल सिमा पीजी, मातोश्री बिल्डींग मुकाईनगर, हिंजवडी 

२) मयुर घनश्याम कपाटे वय-२५ वर्षे रा. रुमनं. ५३, चौथा मजला, बिल्डींग नं.४, लिंक रोड, अशोकनगर, पिंपरी

३) अक्षय विजय मंधान वय-२८ वर्षे रा. दुसरा मजला, ए विंग, पियुष पार्क, शिवाजी पुतळ्या जवळ, पिंपरीगाव


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance