कुरुळीत आय-२० कारची पादचाऱ्याला धडक

कुरुळीत आय-२० कारची पादचाऱ्याला धडक

मोशी | १४ नोव्हेंबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या ५८ वर्षीय पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पादचाऱ्याच्या बरगड्यांना, उजव्या हाताला आणि उजव्या खांद्याला दुखापत झाली. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कुरुळी परिसरातील पुणे-नाशिक महामार्गावर, चिंबळी फाट्याजवळ घडली.

या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे.

प्रसाद चांगदेव कुहीले (वय ३९ वर्षे, कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रसाद कुहीले हा त्याच्या ताब्यातील हुंडाई कंपनीची आय-२० कार क्रमांक MH-01 AD-7138 घेऊन पुणे बाजूकडून नाशिकच्या दिशेने जात होता.

त्यावेळी वसंत रामराव पखाली (वय ५८ वर्षे) हे चिंबळी फाट्याजवळ पायी रस्ता ओलांडत होते. कारचालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून त्यांना धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या धडकेमुळे वसंत पखाली यांना रस्त्यावर पडून दुखापत झाली. अपघातात त्यांच्या बरगड्यांना, उजव्या हाताला आणि उजव्या खांद्याला मार लागून किरकोळ तसेच गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कारचालकाने वाहन चालवताना आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे हा अपघात घडला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून निघून गेला, असे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर संबंधित महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि ३२४(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories