गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांना घरपोच पुरणपोळ्या मिळणार, पुरणपोळी महोत्सवाचे आयोजन
Mar 18 2026
41
गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांना घरपोच पुरणपोळ्या मिळणार, पुरणपोळी महोत्सवाचे आयोजन
पुणे, ता. १८ - गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांना घरगुती चवीच्या पुरणपोळ्यांच्या भोजनाचा आनंद घेता येणार आहे. मुंबई महापालिकेद्वारे अर्थसहाय्यित महिला बचत गटांच्या माध्यमातून 'पुरणपोळी महोत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकरांना ऑनलाइन मागणीनुसार पुरणपोळ्या घरपोच मिळणार आहेत.
महिलांच्या कौशल्याला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवांतर्गत स्थानिक बचत गटांनी अत्यंत स्वच्छतेने आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या उपलब्ध असतील. ३ ते १० पुरणपोळ्यांच्या सोयीस्कर पॅकमध्ये उपलब्ध असतील. अवघ्या १५० रुपयांपासून पुरणपोळी खरेदी करता येणार आहे.
मुंबईकरांनी या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांनी https://shgeshop.com या संकेतस्थळावर आपली मागणी नोंदवायची आहे. नोंदणी केलेल्या ग्राहकांना गुरुवारी (ता. १९) रोजी घरपोच पुरणपोळी पुरवली जाईल, अशी माहिती नियोजन संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली आहे.