महापालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे - विश्वजीत बारणे 

पिंपरी, ता. २७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे यांनी केली आहे. आपला नगरसेवक सभागृहात काय बोलतो, हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. त्यामुळे तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी बारणे यांनी केली आहे.

याबाबत, विश्वजीत बारणे यांनी महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. त्यात गटनेते बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही महापालिकेच्या कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते. महापालिका सभागृहात निवडून आलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या चुकीच्या कामांना विरोध करून शहराच्या विकासकामांना सातत्याने प्राधान्य देत असतात. नगरसेवक सभागृहात नेमके काय काम करत आहेत. शहराच्या प्रश्नांवर आपली काय मते मांडत आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. ज्याप्रमाणे देशामध्ये लोकसभा आणि राज्यांमध्ये विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाते. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही आपल्या सर्वसाधरण सभेचे थेट प्रक्षेपण सुरू करावे.

जनहिताच्या दृष्टीने अशा प्रकारे सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घ्यावा. हा निर्णय घेतल्यास महापालिका सभागृहातील महासभेचे कामकाज थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेणारी पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरेल. त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार करून सभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात यावी. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance