अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहर विकासाबाबतच्या महत्त्वाच्या मागण्यांना मंजुरी, आमदार अमित गोरखे यांची पत्रकार परिषदेत माहिती
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहर विकासाबाबतच्या महत्त्वाच्या मागण्यांना मंजुरी, आमदार अमित गोरखे यांची पत्रकार परिषदेत माहिती
पिंपरी, ता. २६ - राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पिंपरी-चिंचवड शहराच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. प्रश्न मांडून या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक कृती आराखडा आणि निधीचे ठोस आश्वासनही मिळवले आहे, अशी माहिती आमदार अमित गोरखे यांनी आज, गुरुवारी (ता. २६) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनामध्ये आपल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी मांडलेल्या विषयांची माहिती देण्यासाठी आमदार गोरखे यांनी विशेष पत्रकार आयोजित केली होती.
आमदार गोरखे म्हणाले, ''शहराच्या विस्तारित भागातील रस्ते, उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा योजनांसाठी राज्य शासनाकडून विशेष निधी मिळवण्यावर भर दिला असून, प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.''
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, उपमहापौर शर्मिला बाबर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष संजय (नाना) काटे, ज्येष्ठ नेते सदाशिव खाडे, राजू दुर्गे, नगरसेवक तुषार हिंगे, शितल उर्फ विजय शिंदे, कुशाग्र कदम, अमित गावडे, नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, मधुरा शिंदे, दक्षिण भारतीय आघाडी प्रमुख राजेश पिल्ले, भाजपा मंडल अध्यक्ष धरम वाघमारे, भाजपा मंडल अध्यक्षा सौ.अनिता वाळूजकर, भाजपा चिटणीस नरेश पंजाबी, राजेंद्र बाबर, युवराज लांडे, देवदत्त लांडे, नंदू कदम, नेताजी शिंदे, सुनील पलांडे, सुनील कदम उपस्थित होते. सभागृहात पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गोरखे यांचे वैयक्तिकरीत्या कौतुक केले आहे.
विकासाची गंगा घराघरांत पोहोचवू....
''शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर केवळ चर्चा न करता, ते तडीस नेण्यासाठी मी विधानपरिषदेत आवाज उठवला. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाची गंगा घराघरांत पोहोचवू. पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. येत्या काळात रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावून, शहराचा समतोल विकास साधणे हेच आमचे प्राथमिक ध्येय आहे.''
– अमित गोरखे, आमदार
अमित गोरखे यांनी मांडलेले प्रमुख विषय -
१) पिंपरी-चिंचवड पाणीप्रश्न ३० MLD वाढीव पाणी आणि जॅकवेल प्रकल्पाची विधानसभेत मागणी
२) पिंपरी-चिंचवड 'आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ'
३) स्पाच्या नावाखालील देहव्यापार रोखण्यासाठी 'कडक नियमावली'
४) PMPML बस कंत्राट प्रक्रियाः पारदर्शकतेचा अभाव आणि चौकशीची मागणी
५) PCMC अग्निशमन विभागः 'सावळ्या गोंधळाची' उच्चस्तरीय चौकशी
६) PCMC बोगस व दुरस्त शिक्षण पदोन्नतीः विशेष समितीमार्फत चौकशी
७) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीः पारदर्शकतेसाठी डिजिटल 'ई-नाम'चा आग्रह
८) ताथवडे शासकीय जमीन घोटाळाः दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन
९) पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र 'अप्पर जिल्हाधिकारी' कार्यालय पाहिजे
१०) चाकण येथील घटना - श्वानांच्या हल्ल्यात एका भगिनीचा यांचा झालेला मृत्यू