news
clock
लोणावळ्याचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याची मागणी

लोणावळ्याचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याची मागणी

लोणावळ्याचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याची मागणी 

पिंपरी, ता. १७ -  लोणावळा नगरपरिषदेच्या विकास आराखड्याचे पुनरावलोकन करुन सुधारित विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नासीर शेख यांनी केली आहे. 

याबाबत, शेख यांनी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निवेदन देत चर्चा केली. यावेळी प्रफुल राजपूत, अभय परदेशी, पुजा सुशील गुप्ता, रजीन शेख, ईशान गुप्ता आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, लोणावळा शहरात पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन शहराचा सर्वसमावेशक आणि आधुनिक विकास आराखडा तयार होणे आवश्यक आहे. 

सदर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories