पवना धरणाच्या काठावरुन ट्रकमधून दररोज होणारी मुरुम तत्काळ चोरी रोखा, चोरांवर 'मोक्का' लावा

पवना धरणाच्या काठावरुन ट्रकमधून दररोज होणारी मुरुम तत्काळ चोरी रोखा, चोरांवर 'मोक्का' लावा

पवना धरणाच्या काठावरुन ट्रकमधून दररोज होणारी मुरुम तत्काळ चोरी रोखा, चोरांवर 'मोक्का' लावा 

शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांची मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे कारवाईची मागणी 

पिंपरी, ता. १४ - मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून दररोज रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत 50 पेक्षा अधिक हायवा डंपरद्वारे  मुरूम व मातीचे अवैध उत्खनन सुरु आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्काळ या प्रकाराची दखल घेऊन मुरुम माफियांवर 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.

याबाबत युवराज दाखले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पवना धरण हे लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. याच धरणाच्या काठावरुन जेसीबी-पोकलेन लावून 20-30 फूट खोल खड्डे खणून मुरुम चोरला जात आहे. विना नंबर प्लेटचे हायवा ट्रक हे गेव्हाण खडक, चांदेवाडी, ठाकूरसाई, ब्राह्मोली, कोथुर्णे, शिवली मार्गे चांदखेडकडे जातात. या मुरुम चोरीमुळे धरणाच्या भिंतीला धोका पोचतोय, धरणाची साठवण क्षमता घटतेय. तसेच 1966 चा महसूल कायदा व 1986 चा पर्यावरण कायदा पायदळी तुडवला जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नापिक होऊन शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.


 हे अवैध प्रकार स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही,  असा गंभीर आरोप युवराज दाखले यांनी केला.  येत्या आठवड्यात प्रशासनाने कारवाई न झाल्यास शिवशाही व्यापारी संघ व शेतकरी मिळून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल. मुरूम माफियांना मावळातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.


शिवशाही व्यापारी संघाच्या मागण्या -

1.  मुख्यमंत्र्यांनी विशेष भरारी पथकनेमून 24x7 गस्त लावावी

2.  मुरूम माफिया व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल करावेत

3.  पवना धरण 5 किमी परिसर "No Mining Zone"घोषित करावा

4.  ड्रोन सर्व्हे करून दंडात्मक वसुली करावी

5.  जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून 7 दिवसांत अहवाल मागवावा

6.  सर्व हायवा-डंपर जप्त करून वाहतूक बंद करावी





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories