सन २०२६-२७ चा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ५ हजार ६५५ कोटी ७३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर 

पिंपरी, ता. २७ - सन २०२६-२७ या वर्षाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांना शनिवारी (ता. २८) सादर केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा ४४ वा मूळ अर्थसंकल्प ५ हजार ६५५ कोटी ७३ लाख रुपयांचा आहे.

अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी प्रवीण जैन, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे व इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करताना अंदाजपत्रकामध्ये घेतलेल्या सहभागाबाबत नागरीकांचे आभार मानले. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी नागरीकांच्या एकूण ४ हजार ९९६ सूचना प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी २९७ सूचना स्विकारण्यात आल्या आहेत. सन २०२५-२६ च्या तुलनेत नागरिकांच्या अर्थसंकल्पातील सहभागात वाढ झाली आहे. 

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात रु. ६२५६.३९ कोटी (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल, हे अपेक्षित धरुन सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे प्रशासकांचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभे मार्फत महापालिका सभेपुढे सादर केले होते. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात रु. ५६६०.७३ कोटी (आरंभीच्या शिल्लकेसह) उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च  रु. ५६५५.७३ कोटी होईल व मार्च २०२७ अखेर रु. ५ कोटी इतकी शिल्लक राहील, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे .........

- शहरातील विकासकामांसाठी एकूण तरतूद - रु. ११८६ कोटी

- क्षेत्रीय स्तरावरील विकास कामांसाठी तरतूद

१. अ क्षेत्रीय कार्यालय -  रु. ६.२९ कोटी

२. ब क्षेत्रीय कार्यालय -  रु. ११.४९ कोटी

३. क क्षेत्रीय कार्यालय - रु. १०.२५ कोटी

४. ड क्षेत्रीय कार्यालय - रु. ११.४४ कोटी

५. इ क्षेत्रीय कार्यालय -  रु. ३.७० कोटी

६. फ क्षेत्रीय कार्यालय - रु. ९.३० कोटी

७. ग क्षेत्रीय कार्यालय - रु. ५.२८ कोटी

८. ह क्षेत्रीय कार्यालय -  रु. ७.९२ कोटी

- स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षातंर्गत रु. ४३६.९४ कोटी तरतूद 

- महापौर निधी - रु ५० कोटी तरतूद 

- शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक - रु. १९५३ कोटी तरतूद 

- जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी - रु. ९९ कोटी तरतूद 

- दिव्यांग कल्याणकारी योजना - रु.६८.३० कोटी तरतूद 

- पाणी पुरवठा विषयक भांडवली विकास कामांकरिता - १५५.७३ कोटी तरतूद 

- पी.एम.पी.एम.एल. करीता - रु. ४०० कोटी तरतूद 

- भूसंपादनाकरीता - रु.१०० कोटी तरतूद 

- अतिक्रमण निर्मुलन व्यवस्थे करिता - रु.१० कोटी तरतूद 

- स्मार्ट सिटीसाठी - रु.५० कोटी तरतूद 

- अमृत २.० योजनेसाठी - रु.५४.४५ कोटी तरतूद 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance