महानगरपालिकेच्या किवळे येथील क्र. ९६ प्राथमिक शाळेला 'ISO' मानांकन प्राप्त
नगरसेवक ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे व धर्मपाल तंतरपाळे यांच्याकडून शाळेचे अभिनंदन
पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या किवळे येथील क्र. ९६ प्राथमिक शाळेला ISO 9001:2015 (Quality Management System) मानांकन मिळाले आहे. गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी, शिस्तबद्ध नियोजन, परिणामकारक अध्यापन पद्धती, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम या बाबींमध्ये शाळेने आपला उच्च दर्जा राखल्याचे या मानांकनातून स्पष्ट झाले. .
Vatsin World Services Private Limited या संस्थेमार्फत शाळेचे मूल्यमापन करण्यात आले.
या यशामागे ‘ब’ प्रभागाच्या पर्यवेक्षिका सौ. सरस्वती भेगडे, प्रभारी मुख्याध्यापक बाबासाहेब आव्हाड तसेच शिक्षकवृंद रेखा गादेकर, वृषाली मुंढे, विनायक शिरतर, मृणाल शिंदे, अर्चना साळुंखे, संपदा काळे, श्रुती मरकड, नेताजी घोलप, विजय ढवळे, सुभाष नलावडे यांनी परिश्रम घेतले. कर्मचारी वर्गाचे सहकार्य, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा विश्वास याचाही मोठा वाटा आहे.
हे आयएसओ प्रमाणपत्र शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा देणारे ठरेल, अशी भावना मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केली आहे. भविष्यातही शाळा अशीच प्रगती करत राहील, असा मानस शिक्षकांनी व्यक्त केला. या यशाबद्दल शिवसेनेच्या नगरसेविका ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे आणि नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.