news
clock
मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर होणार नवीन उड्डाणपूल

मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर होणार नवीन उड्डाणपूल

मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावर होणार नवीन उड्डाणपूल 

पुणे, ता. १८ - पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी (ता. १८) झालेल्या बैठकीत मुंढवा-केशवनगर ते खराडी बायपास रस्त्यावरील महात्मा फुले चौक येथे उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावास  मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मगरपट्टा ते खराडी मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

मगरपट्टा ते खराडी या मार्गावर मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या वरुन मेट्रो लाइन जाणार आहे. उड्डाणपुलाच्या कामाची सुमारे १२० कोटी ११ रुपये किमतीच्या निविदेचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती समोर मांडण्यात आला होता. 

याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, ''पुलाचे काम मेट्रो प्रशासनाशी चर्चा करुन केले जाणार आहे. पुलाच्या पायाच्या पातळीतील बदल, छताच्या क्षेत्रफळातील बदल तसेच शासनाच्या जीएसटी धोरणातील बदल यानुसारही देयकांमध्ये आवश्यक ते समायोजन केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंढवा, केशवनगर, खराडी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.''

असा असेल पूल...

- उड्डाणपुलाची एकूण लांबी १ हजार ८० मीटर व रुंदी १६ मीटर 

- मुख्य पुलाची लांबी ७९६ मीटर

- खराडी बाजूस १३६ मीटर, तर मुंढवा बाजूस १४८ मीटर लांबीचे पोच रस्ते असार आहे. 

- वाहतुकीसाठी स्वतंत्र दुहेरी मार्गिका 

- या उड्डाणपुलासाठी एकूण ३६ पिलर्स उभारण्यात येणार असून त्यापैकी २८ पिलर्स रस्त्यावर, आठ पिअर्स   हे नदीपात्रात असतील. 

- प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित केला असून पावसाळ्याचा कालावधी त्यातून    वगळला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories