news
clock
महापालिका शाळेतील विद्यार्थिनींनी अनुभवली ....'बांधणी कला'

महापालिका शाळेतील विद्यार्थिनींनी अनुभवली ....'बांधणी कला'

महापालिका शाळेतील विद्यार्थिनींनी अनुभवली ....'बांधणी कला'

पिंपरी, ता. १८ -  मोशी येथील पीसीएमसी पब्लिक स्कूल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी नैसर्गिक रंगांचा वापर करुन कपड्यांना रंग देत आकर्षक बांधणी तयार केली. राजस्थान आणि गुजरात येथे प्रसिद्ध असलेली ही पारंपरिक कला विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवली.

रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर वर्गशिक्षिका रुपाली घोडेकर यांनी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यातूनच कपड्यांना नैसर्गिक रंगांनी डाय करण्याची कल्पना पुढे आली. पर्यवेक्षिका सुनीता गीते व मुख्याध्यापिका सुरेखा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यार्थिनींनी हळद, कुंकू, बीटपासून तयार केलेला लाल रंग तसेच इंडिगोपासून तयार केलेला निळा रंग वापरून विविध नमुन्यांची बांधणी तयार विद्यार्थिनींनी नैसर्गिक रंगांचा वापर करून कपड्यांना डाय देत बांधणी तयार केली.

यामध्ये श्रुतिका सोनवणे, पायल सोमवंशी, आरोही शुक्ला, मनस्वी ताडमे, सौम्या नारखेडे, मीनाक्षी राजारकर, श्रुती बंडेवार, लक्ष्मी बोरगावकर, सृष्टी जाधव, किमया जाधव, स्वरा शिंदे, संचिता कांडेकर, अवनी नुच्चे, अनुराधा काळे, जानवी अनपट, कीर्ती देवकर, शर्वरी चौधरी, अनन्या खाटपे व यशश्री मुंडे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कौशल्य विकास.....

''नैसर्गिक रंगांचा वापर या उपक्रमातून सर्जनशीलता, हस्तकौशल्य, समूहभावना आणि स्वावलंबन यांसारखी कौशल्ये विकसित झाली. नैसर्गिक रंगांचा वापर केल्याने पर्यावरणाची जाणीवही निर्माण झाली.''

- सुरेखा डांगे, मुख्याध्यापिका, कन्या शाळा.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories