news
clock
महापालिका वृक्षसंवर्धन विभागाकडून नवीन बोअरवेल घेण्यासाठी व दुरुस्तीसाठी ४१ लाखांच्या खर्चास मान्यता

महापालिका वृक्षसंवर्धन विभागाकडून नवीन बोअरवेल घेण्यासाठी व दुरुस्तीसाठी ४१ लाखांच्या खर्चास मान्यता

महापालिका वृक्षसंवर्धन विभागाकडून नवीन बोअरवेल घेण्यासाठी व दुरुस्तीसाठी ४१ लाखांच्या खर्चास मान्यता

शहरातील विविध ठिकणच्या झाडांना नियमित पाणी पुरवठा होणार 

पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागातर्फे उद्यान व वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या बोअरवेलची दुरुस्ती आणि आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल घेण्याच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी ४१ लाखांचा खर्च होणार आहे.

सदर कामासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये एकूण तीन निविदाधारकांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी दोन निविदा पात्र ठरल्या. त्यामध्ये मे. जीवनधारा ट्यूबवेल कंपनी या ठेकेदाराची निविदा सर्वात वाजवी दराची ठरली. या ठेकेदाराने अंदाजित रक्कम रुपये ४२ लाख ३० हजार ३४७ वर १ टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यामुळे मंजूर दरानुसार या कामासाठी एकूण ४१ लाख ८८ हजार ४४ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. संबंधित ठेकेदार हे काम निश्चित मुदतीत व मानांकनानुसार पूर्ण करण्यास सक्षम असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

निविदेतील अटी व शर्तीनुसार या कामावर वस्तू व सेवा कर लागू राहणार असून, त्यानुसार कर अदा करण्यात येणार आहे. तसेच, ठेकेदारासोबत नियमानुसार करारनामा करुन कामाचा आदेश देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील उद्याने व वृक्षारोपण पण प्रकल्पांना नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories