२८ जूनला शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम
पिंपरी, ता. १९ - महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवारी, दिनांक २८ जून २०२६ रोजी, 'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम' राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला, पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आपल्या परिसरातील महानगरपालिका रुग्णालय, दवाखाना किंवा अधिकृत पोलिओ लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या ५ वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. आपल्या बालकाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी, तसेच पोलिओमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी या मोहिमेत अवश्य सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.
- child health program, immunization program, municipal health department, PCMC health, preventive healthcare
- Pulse Polio campaign, polio vaccination drive
- दोन थेंब पोलिओ, पोलिओमुक्त भारत, आरोग्य मोहीम, महानगरपालिका रुग्णालय
- वैद्यकीय विभाग, पोलिओ लस, पाच वर्षांखालील बालक
- पल्स पोलिओ लसीकरण, राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम