चिखली येथे कामगाराचा मृत्यू, कंपनी मालकावर गुन्हा दाखल 

पिंपरी, ता. २६ -  कंपनीत वाहनांसाठी लागणारे सुटे भाग बनवणाऱ्या प्रेस मशीनमधील पार्ट उडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना १८ फेब्रुवारीला चिखली येथील नवतेज प्रेसींग अॅण्ड इंजीनिअरींग, गट क्रमांक १२६४, साने इंडस्ट्रीज येथे घडली आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकाविरुद्ध बुधवारी (ता.२५) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत, अक्षय सोपान शिळीमकर (वय ३० वर्षे) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवतेज प्रेसिंग अॅण्ड इंजिनिअरिंग येथे वाहनांसाठी लागणाऱ्या पार्टचे प्रेस टूल्स तयार करण्याचे काम सुरु असताना मशीनमधून पार्ट उडून अपघात झाला. या घटनेत सुनिल व्यंकट बडघे (वय ४१, रा. सह्याद्री सोसायटी, अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली) यांचा मृत्यू झाला. कंपनीत काम करताना अशा प्रकारचा अपघात होण्याची शक्यता माहिती असूनही कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात निष्काळजीपणा केला. 

याप्रकरणी, आरोपी अशोक जगन्नाथ वराडे (वय ७०, रा. संभाजीनगर एमआयडीसी, चिंचवड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५ अन्वये चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance