महामेट्रोतील कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबतच्या प्रश्नावर आंदोलन

महामेट्रोतील कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबतच्या प्रश्नावर आंदोलन

महामेट्रोतील कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबतच्या प्रश्नावर आंदोलन 

पिंपरी, ता. १९ -  महामेट्रोतील कंत्राटी कामगारांवर प्रशासनाकडून वेतन, रजा याबाबत सातत्याने अन्याय होत असल्याच्या कारणास्तव भारतीय मजदूर संघाशी बरोबर संलग्न कामगार संघटनेच्या वतीने महामेट्रोच्या प्रशासन कार्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी, मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे म्हणाले की,  ''पुणे मेट्रोत काम करणारे कंत्राटी कामगार त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित आहेत. १८ फेब्रुवारी २०२५ मध्ये सरकारने त्यांच्याबाबत स्पष्ट निर्णय दिला आहे. त्यानुसार त्यांना केंद्रीय कर्मचारी दरानेच वेतन देणे महामेट्रो प्रशासनावर बंधनकारक आहे. त्यासाठी संघटनेने अपर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयाकडे मेट्रो प्रशासन दुर्लक्ष करत आहे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories