news
clock
बोअरवेलचे काम करताना मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र, मेट्रोमार्गिकेवर पाणी गळती, तत्काळ बुजवले छिद्र

बोअरवेलचे काम करताना मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र, मेट्रोमार्गिकेवर पाणी गळती, तत्काळ बुजवले छिद्र

बोअरवेलचे काम करताना मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र, मेट्रोमार्गिकेवर पाणी गळती, तत्काळ बुजवले छिद्र

पुणे, ता. २६ - शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या  मंडई स्थानकाजवळ बोअरवेलचे काम मेट्रो प्रशासनाची परवानी न घेताच सुरु होते. हे काम सुरु असताना थेट मेट्रोच्या बोगद्यालाच छिद्र पडल्याने 

पाणीगळती होऊ लागल्याचे १४ मार्च रोजी समोर आले. बोगद्याला पडलेला छिद्र हे सहा इंचाचे होते. हे लक्षात आल्यावर तत्काळ हे छिद्र बुजवण्यात आले. या प्रकरणी घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार या दोघांविरुद्ध सोमवारी (ता. २३) गुन्हा दाखल केला आहे. 

 १४ मार्च रोजी बोगद्यात पाण्याची गळती होत असल्याचे समजले. वॉटर अलर्ट ही मेट्रो सिस्टीमवर दिसू लागला. मेट्रो अधिकाऱ्यांनी संपूर्ण बोगद्याची पाहणी केली. या प्रकरणी ‘महामेट्रो’चे संयुक्त महाव्यवस्थापक (सिव्हिल) शंतनु गोरात्रा यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली.  

मोटे यांनी लोकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण होणारे कृत्य केले. ‘महामेट्रो’च्या मालमत्तेचे मूल्य किंवा उपयुक्तता नष्ट होईल किंवा कमी होईल असे कृत्य केले. यामुळे मेट्रोच्या मालमत्तचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.  त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी यांनी दिली. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories