news
clock
'बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड' सोहळ्यात 'पुणे मेट्रो रेल फेज-१'चा गौरव

'बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड' सोहळ्यात 'पुणे मेट्रो रेल फेज-१'चा गौरव

'बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड' सोहळ्यात 'पुणे मेट्रो रेल फेज-१'चा गौरव   

पिंपरी, ता. २८ - दिल्लीमध्ये झालेल्या 'बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड - २०२६' या समारंभात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) पुणे मेट्रो रेल प्रकल्पातील फेज-१ ला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. पुणे मेट्रोला 'इम्पॅक्ट' या श्रेणीत हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील उपस्थित होते. महामेट्रोने पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बदल घडवून आणला आहे तसेच मेट्रोद्वारे मोठी रोजगारनिर्मिती झाली आहे. या योगदानाबद्दल हा सन्मान मेट्रोला मिळाला आहे. 

महामेट्रोच्या वतीने पुणे मेट्रोचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. मनोगत व्यक्त करताना गाडगीळ म्हणाले,  "पुणे मेट्रोचा फेज-१ प्रकल्प शहराच्या आर्थिक विकासाचा कणा ठरत आहे. या यशानंतर आता पुणे मेट्रो आपल्या आगामी विस्तार प्रकल्पांकडे पूर्ण ताकदीनिशी लक्ष केंद्रित करत आहे. "


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories