सुरक्षा रक्षकांकडून दरमहा पैसे उकळल्याचा आरोप; सुपरवायझरची तक्रार

सुरक्षा रक्षकांकडून दरमहा पैसे उकळल्याचा आरोप; सुपरवायझरची तक्रार

मावळ | 12 सप्टेंबर 2026 : कंपनीतील सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडून दरमहा पैसे उकळल्याचा प्रकार नवलाख उंब्रे येथे समोर आला आहे. याप्रकरणी सुरक्षा सुपरवायझरने दिलेल्या तक्रारीवरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी 2026 ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत ग्लोबल डॅनफॉस कंपनीमध्ये हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. सत्यवीर सिताराम सिंग (वय 22, व्यवसाय-सुरक्षा सुपरवायझर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसह त्यांचे सहकारी सुरक्षा रक्षक चैन सिंग, बिशन सिंग, जसबीर सिंग, सागर सिंग, काकाराम सिंग, टुनटुन दास आणि अन्य सात सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. फिर्यादीकडून 19 हजार 800 रुपये, तर प्रत्येक सुरक्षा रक्षकाकडून दरमहा सुमारे दोन हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे.

पैसे देण्यास विरोध केल्यावर शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मोहरसिंग राजाराम राजपूत (वय 40) याच्याविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 271/2026 नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories