news
clock
चिखली येथे कोयत्याने हल्ला; एक आरोपी अटकेत

चिखली येथे कोयत्याने हल्ला; एक आरोपी अटकेत

चिखली येथे कोयत्याने हल्ला; एक आरोपी अटकेत

पिंपरी, ता. २० - चिखली परिसरातील मोरेवस्ती येथील अष्टविनायक चौकात बुधवारी (ता. १८)  रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून तरुणांवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी गुरुवारी (ता. १९ फेब्रुवारी) दुपारी गुन्हा दाखल केला आहे.

सिध्देश अशोक वाघमारे (वय १८, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी “आम्ही इथले दादा आहोत” असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचे मित्र वेदांत लोखंडे आणि वैजनाथ शिंदे यांच्यावर कोयत्याने डोक्यात, पाठीवर व पायावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी हरिष राकेश त्रिपाठी (वय १८) याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींवर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories