news
clock
'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलार' योजनेबाबत नागरीकांना मिळाली माहिती, महावितरणचा उपक्रम

'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलार' योजनेबाबत नागरीकांना मिळाली माहिती, महावितरणचा उपक्रम

'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलार' योजनेबाबत नागरीकांना मिळाली माहिती, महावितरणचा उपक्रम

पिंपरी, ता. २० - शिवजयंतीचे औचित्य साधून महावितरण खराळवाडी उपविभागातर्फे गणेशनगर-दापोडी व खराळवाडी येथे 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलार' योजनेबाबत माहिती देण्यासाठी शिबिर घेण्यात आले.

राज्य शासनाकडून दारिद्रयरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील 'स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय सोलार' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत एक किलोवॅटचे सोलार अनुदानावर (सबसिडी)  देण्यात येणार आहे. एक किलोवॅट सोलारला पन्नास हजर रुपये खर्च येतो. परंतु, दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) ग्राहकास सदर सोलार जोडणीसाठी २५०० रुपये खर्च व  ४७ हजार ५०० रूपये अनुदान मिळते. सर्वसाधारण गटासाठी महिना १०० युनिट्स पेक्षा कमी वापर करणाऱ्यांना १० हजार रुपये खर्च व ४०हजार रुपये अनुदान मिळते.  अनुसूचित जाती व जमाती गट महिना १०० युनिट्स पेक्षा कमी वापर यांना ५००० रुपये खर्च व ४५ हजार रुपये अनुदान लागू असते, अशी योजनेची सविस्तर माहिती नागरीकांना देण्यात आली.

कार्यक्रमास खराळवाडी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भुजंग बाबर, खराळवाडी शाखेचे साहाय्यक अभियंता राहुल पालके, इंद्रजित खराबस, ज्ञानेश्वर साळुंके, गणेश चव्हाण व लाभार्थी ग्राहक उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories