news
clock
पुढील चार आठवडे चक्रीवादळाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

पुढील चार आठवडे चक्रीवादळाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

 पुढील चार आठवडे चक्रीवादळाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज 

पिंपरी, ता. २० - गेल्या दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानेपुढचा आठवडाभर दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. पुढील चार आठवडे चक्रीवादळ निर्मितीची शक्यता आहे. त्यामुळे, २० ते २६ फेब्रुवारीपर्यंत संबंधित यंत्रणांना राहण्याच्या सूचना दिल्या आहेत , असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. 

पुढील काही दिवसांत हवामानाची स्थिती स्पष्ट होईल. नागरिकांनी अधिकृत हवामान खात्याच्या सूचनांवर विश्वास ठेवावा. अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. हवामान विभागाने १९ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या विस्तारित कालावधीच्या अंदाजानुसार, २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान समुद्रातील वातावरणीय बदल, दाब प्रणाली आणि वाऱ्यांचा वेग याचे विशेष निरीक्षण केले जाणार आहे. अद्याप कोणतेही ठोस चक्रीवादळ जाहीर केले नसले तरी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागातील प्रशासनानेही आवश्यक तयारी ठेवावी, अशा सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories