news
clock
दत्तक बाळांच्या मातांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणे असंवैधानिक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

दत्तक बाळांच्या मातांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणे असंवैधानिक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

दत्तक बाळांच्या मातांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणे असंवैधानिक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पुणे, ता. १७ - आईच्या गर्भातून जन्मलेल्या आणि दत्तक घेतलेल्या मुलांमध्ये कोणताही फरक नाही, असे स्पष्ट करुन  तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणे असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 

हमसानंदिनी नंदूरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (PIL) सुनावणी करताना  न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

हा निकाल देताना न्यायालयाने सांगितले आहे की, ज्या महिला मोठ्या वयाच्या मुलाला दत्तक घेतात, त्या देखील तीन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलांप्रमाणेच स्थितीत असतात. त्यामुळे 

तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणे असंवैधानिक आहे.

या दरम्यान, मातृत्व रजेबरोबरच पितृत्व रजेबाबतही कायदा करावा, अशी शिफारसही न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories