स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावरील मेट्रो कामामुळे 'पीएमपी' बससेवेत तात्पुरते बदल
पुणे, ता. १४ - पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गावरील मेट्रो कामकाजामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही ठिकाणी पुणे महानगर परिवहन महामंडळ बससेवेच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) दिली आहे.
या बदलाची सदर मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंद घ्यावी तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूस नॉन बी. आर. टी. बसस्टॉपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे 'पीएमपीएमएल' व्यवस्थापनाने सांगितले आहे.
- सदर बदल पुढीलप्रमाणे राहतील -
- पंचमी हॉटेल व भापकर पंप परिसर
स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना तसेच कात्रजकडून स्वारगेटकडे येताना बसेस बीआरटी मार्गातून संचलनात राहतील.
- अरण्येश्वर कॉर्नर व नातूबाग परिसर
स्वारगेटकडून जाताना तसेच कात्रजकडून येताना बसेसचे संचलन सर्व्हिस रोडने करण्यात येईल.
- पद्मावती, के.के. मार्केट, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, कात्रज सर्पोद्यान व मोरे बाग परिसर
स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना बसेस बीआरटी मार्गातून संचलनात राहतील.
कात्रजकडून स्वारगेटकडे येताना बसेस सर्व्हिस रोडने संचलनात राहतील.
- सर्व्हिस रोड, Service Road, बसस्टॉप, Bus Stop, रस्त्याचे बाजू, Roadside, प्रवाशांना सूचना, Passenger Advisory, वाहतूक व्यवस्थापन, Traffic Management
- वाहतूक कोंडी, Traffic Jam, प्रवाशांची गैरसोय, Passenger Convenience,
- पुणे मेट्रो, Pune Metro, पीएमपीएमएल, PMPML, बससेवा, Bus Service, तात्पुरते बदल, Temporary Changes,
- स्वारगेट, Swargate, कात्रज, Katraj, बीआरटी मार्ग, BRT Corridor,