news
clock

टेम्पोचालकाच्या निष्काळजीपणामुळे ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरी, ता. १७ - तळेगाव दाभाडे परिसरात गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (ता. १६) दुपारी सुमारे ३.०० वाजता सोमाटणे गावठाणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुयश ग्रीन सोसायटीसमोर घडला. ज्ञानेश्वरी गुऱ्हे असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत, यश हनुमत कराळे (वय २२, रा. ठी – राम मंदिराजवळ, मावळ, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी टेम्पो चालकाने गॅस डिलिव्हरीसाठी वाहन उभे करत असताना तो हँडब्रेक लावायला विसरल्याने वाहन अचानक पुढे झेपावले व पाठीमागून ज्ञानेश्वरीला धडकले. यात ती गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी घटनस्थळावरुन पळून गेला आहे. 

बुधाराम गोकुळराम विश्नोई (वय ३५, रा. ठी – गट नं. ८४, कासारसाई रोड, गोडउब्रे, मावळ) व ओमप्रकाश अर्जुनराम बिश्नोई (वय ४८, रा. ठी – गट नं. ८४, कासारसाई रोड, गोडउब्रे, मावळ) या आरोपींविरोधात 

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अद्याप अटक केली नाही. 

पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories