मिक्स्ड मार्शल आर्ट्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये 'UFFC Ultimatum MMA'क्लबच्या खेळाडूंचे भरघोस यश
मिक्स्ड मार्शल आर्ट्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये 'UFFC Ultimatum MMA'क्लबच्या खेळाडूंचे भरघोस यश
पिंपरी, ता. २८ जुलै २०२६ - इंदौर येथे नुकत्याच पार पडलेल्या 9 व्या मिक्स्ड मार्शल आर्ट्स (Mixed Martial Arts) इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2026 मध्ये महाराष्ट्राच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण भारतात उपविजेतेपद (2nd Place) पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्रातून एकूण 78 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, त्यापैकी UFFC Ultimatum MMA क्लबच्या तब्बल 36 खेळाडूंनी राज्याचे प्रतिनिधित्व केले.
या यशामध्ये पुणे जिल्हाध्यक्ष नरेश म्हेत्रे सर, हेड कोच निलेश घोंगडे सर आणि टीम मॅनेजर पल्लवी पाटील यांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन व नियोजन करून महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेतील महाराष्ट्राच्या उल्लेखनीय यशामुळे राज्यातील MMA खेळाला नवी दिशा मिळाली असून, UFFC Ultimatum MMA क्लबच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली दमदार छाप उमटवली आहे. UFFC Ultimatum MMA क्लबने सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
UFFC Ultimatum MMA क्लबचे पदक विजेते
मुली -
🥇 अदिती खैरनार – सुवर्णपदक
🥈 अद्विका वाघमोडे – रौप्यपदक
🥉 त्विषा बडगुजर – कांस्यपदक
🥉 यज्ञा जाधव – कांस्यपदक
🥉 दुर्गा आगाव – कांस्यपदक
मुले -
🥇 सुमेध कल्पांडे – सुवर्णपदक
🥇 प्रवीण राठोड – सुवर्णपदक
🥇 शांतनू – सुवर्णपदक
🥇 अर्नव बोसले (Arnav Bosle) – सुवर्णपदक
🥇 चैतन्य लष्करे – सुवर्णपदक
- इंदौर, Indore, राष्ट्रीय स्पर्धा, National Championship, मार्शल आर्ट्स, Martial Arts, कॉम्बॅट स्पोर्ट्स, Combat Sports, सुवर्णपदक, Gold Medal, रौप्यपदक, Silver Medal, कांस्यपदक, Bronze Medal
- महाराष्ट्र संघ, Team Maharashtra, महाराष्ट्र उपविजेता, Maharashtra Runner-up
- UFFC Ultimatum MMA Club
- MMA India National Championship 2026, इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप
- मिक्स्ड मार्शल आर्ट्स, Mixed Martial Arts, MMA