news
clock
हिंदू संमेलनानिमित्त रविवारी बोऱ्हाडेवाडी-मोशी परिसरात वाहतूक मार्गात बदल

हिंदू संमेलनानिमित्त रविवारी बोऱ्हाडेवाडी-मोशी परिसरात वाहतूक मार्गात बदल

हिंदू संमेलनानिमित्त रविवारी बोऱ्हाडेवाडी-मोशी परिसरात वाहतूक मार्गात बदल 

पिंपरी, ता. २१ - सकल हिंदू समाजाच्या वतीने बोऱ्हाडेवाडी-मोशी, शिवरस्ता येथे रविवारी (ता. २२) विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी  सदर कार्यक्रमसाठी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजातील नागरीक उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रविवारी सकाळी ७ ते १० यावेळेत कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, त्याबाबतचे आदेश पिपंरी चिंचवड शहर वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिले आहेत. 

नागरीकांनी रविवारी पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

चिखली वाहतुक विभागांतर्गत वाहतूकीतील बदल असे .....

१) प्रदिप स्वीट कॉर्नर शिवरोड पासून सिल्वर गार्डेनिया सोसायटीकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- १) शिवरोडने सी.एन.जी पंपाकडून येणारी वाहने प्रदिप स्वीट कॉर्नर येथे उजवीकडे न वळता सरळ पुढे जाऊन लक्ष्मी चौकातून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग- २) लक्ष्मी चौकाकडून शिवरोडने येणारी वाहने प्रदिप स्वीट कॉर्नर येथे डावीकडे न वळता सरळ पुढे जाऊन कुमार प्रथम सोसायटी पासून डावीकडे वळून पुढे हॉटेल क्राऊन पॉईंट येथून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

२) माऊली भेळकडून सिल्वर गार्डेनिया सोसायटी येथून शिवरोडकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- माऊली भेळकडून येणारी वाहने हॉटेल क्राऊन पॉईंटजवळून डावीकडे वळून सरळ पुढे जाऊन कुमार लाइफस्पेस सोसायटी जवळून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories