छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मौजे वढू बुद्रुक परिसरात वाहतूकीत बदल
Mar 17 2026
53
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मौजे वढू बुद्रुक परिसरात वाहतूकीत बदल
पुणे, ता. १७ - धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मौजे वढू बुद्रुक येथे १७ मार्च २०२६ रोजी रात्री १० ते १८ मार्च २०२६ रोजी रात्री १० पर्यंत परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच व्ही.व्ही.आय.पी., व्ही.आय.पी. तसेच शासकीय वाहनांना हे बदल लागू नसतील, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
असे असतील वाहतूकीतील बदल -
- कोरेगाव भिमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भिमा-सणसवाडी-शिक्रापूर-गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे वळविण्यात येणार आहे. - चाकण-पाबळकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला-गॅस फाटा-शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भिमा मार्गे वळविण्यात येईल.
- कोरेगाव भिमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळील ठरविण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
- चाकण व पाबळ मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना वढू-वाजेवाडी चौफुला मार्गावरील पार्किंग स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास परवानगी राहणार नाही.