news
clock
आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक 

पिंपरी, ता. ९ - वारकरी संप्रदायातील गुरुंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शनिवारी (ता. ९) सकाळी हा प्रकार घडला आहे. 

किर्तनकार हभप संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांच्या अंगावर शाईची बाटली ओतली.  लवांडे यांनी यापूर्वी "सर्व संतांचा छळ मनुवादी, प्रतिगामी आणि वैदिक परंपरेतल्या लोकांनी केला" असे विधान केले होते. तसेच  लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील 'घुसखोरांची' एक यादी जाहीर केली होती, ज्यात भंडारेंचे नाव होते. तसेच भारतीय जनता पक्षाच्या (BJP)महाराष्ट्र प्रदेश आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

शाई ओतण्यापूर्वी संग्राम भंडारे यांनी लंवाडे यांना,  ''गुरुवर्यांना काही बोलायचे नव्हते, गुरुवर्य आमचे सर्वस्व आहे. परत बोलला तर लक्षात ठेव, काय भिडायचं ते आम्हाला भिड.'', असे सुनावले. आणि लगेच त्यांनी सहकाऱ्यांसह शाईच्या बाटल्या लवांडे यांच्यावर ओतल्या. 

या घटनेला कट्टरतावाद असे संबोधून विकास लवांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  "खरे वारकरी असे हिंसक गुंड प्रवृत्तीचे नसतात, केवळ धर्मांधता रुजवली आहे," असे त्यांनी म्हटले आहे. शाईफेकीसोबतच आपल्याला धक्काबुक्की करुन पिस्तूल दाखवण्यात आले व जीव मारण्याची धमकीही दिली असा आरोप लवांडे यांनी केला आहे. 

विकास लवांडे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी व्हिडीओत म्हटलं की, "आज सकाळी माझं आळंदी येथे दशक्रियेच्या कार्यक्रमानिमित्त प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर मी पुण्याच्या दिशेनं निघालो. वारकरी संप्रादयातील संग्राम भंडारे आणि १०-१५ गोरक्षक होते. त्यांच्या दोन तीन गाड्या होत्या. या सगळ्या गुंडांनी मला निर्जनस्थळी अडवलं. मला गाडीतून खाली उतरवून माझ्या अंगावर शाईच्या दोन-तीन बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली. "




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories