वाकडमध्ये २६ वर्षीय युवकाकडून ३८ हजार रुपयांची मॅफेड्रॉन पावडर जप्त

वाकडमध्ये २६ वर्षीय युवकाकडून ३८ हजार रुपयांची मॅफेड्रॉन पावडर जप्त

वाकडमध्ये २६ वर्षीय युवकाकडून ३८ हजार रुपयांची मॅफेड्रॉन पावडर जप्त 

पिंपरी, ता. १९ -  वाकड परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईत पोलिसांनी एका युवकाकडून ३८  हजार रुपयांची एमडी (मॅफेड्रॉन) पावडर, मोबाईल फोन व दुचाकी असा एकूण सुमारे रुपये १,५८,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई गुरुवारी (ता. १८) रात्री पावणे नऊच्या सुमारास श्री साई इंग्लिश स्कूलच्या मागील मोकळ्या मैदानात, वाकड येथे करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारीच वाजता वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निसार अकबर मुजावर (वय २६ वर्षे) असे असून तो फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आरोपीचा मूळ पत्ता हंगरगा नळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव असा असून तो सध्या गुजर नगर, थेरगाव, पुणे येथे वास्तव्यास आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ७.६० ग्रॅम पांढरट-मळकट रंगाची एमडी (मॅफेड्रॉन) पावडर जप्त करण्यात आली, ज्याची अंदाजे किंमत ₹३८,०००/- आहे. यासोबत प्लॅस्टिक पिशव्या, एक मोबाईल फोन आणि एक मोपेड दुचाकी असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये कलम ८(क) आणि २२(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories