भाडेतत्वावर कार परत न देता कार घेऊन आरोपी फरार
पिंपरी, ता. १६ -झुम कार या अॅपद्वारे भाडेतत्त्वावर नेलेली स्वीफ्ट कार मुदतीनंतरही परत न केल्याप्रकरणी एका युवकावर रविवारी (ता. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुहास सुरेश निकते (वय ३२) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार अशोक भांगे (रा. शिवाजीनगर) याने झुम कार या अॅपवर फिर्यादीकडील मारुती सुझुकी कंपनीची सिल्व्हर रंगाची ५,००,०००/- किंमतीची स्वीप्ट कार १५ दिवसाकरीता भाड्याने बुक केली व तो कार घेऊन गेला होता. परंतु त्याने फिर्यादी तसेच कंपनीचा विश्वासघात करुन नेलेली कार फिर्यादीस परत आणून दिली नाही.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता - २०२३ चे कलम ३१६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.