तळेगाव दाभाडे | २४ सप्टेंबर २०२६ : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय महिला कामगाराला मदत करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी व्यक्तींनी हातचलाखीने त्याचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेत दुसरे कार्ड त्याला दिले. त्यानंतर मूळ कार्डाचा वापर करून बँक खात्यातून ३४ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला.
या प्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास एसबीआय शांताई सिटी, तळेगाव दाभाडे येथील एटीएममध्ये घडली. फिर्यादी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्या असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना मदत करण्याचे सांगितले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने स्वतःकडे घेतले आणि त्या जागी हरिलाल जयस्वाल नावाचे एसबीआय बँकेचे दुसरे एटीएम कार्ड फिर्यादीला दिले. त्यानंतर फिर्यादीचे मूळ एटीएम कार्ड वापरून त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून ३४ हजार ५०० रुपये एटीएममधून काढण्यात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.