news
clock
जुन्या जमिनीच्या वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न

जुन्या जमिनीच्या वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न

जुन्या जमिनीच्या वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न 

पिंपरी, ता. ८ – जुन्या जमिनीच्या वादातून ३८ वर्षीय तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. ६ मे) खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील पवार वस्तीमध्ये घडली. 

फिर्यादी किरण बबन शिंदे (वय ३८ वर्षे, व्यवसाय शेती व व्यवसाय, रा. संस्कृती निवास, पवारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खंडू बापू पवार (वय ५० वर्षे रा. पवारवस्ती, खालूंब्रेता. खेड), पोपट बापू पवार (वय- ५५ वर्षे रा. पवारवस्ती, खालूंब्रे ता. खेड) व  एक अनोळखी इसम या घटनेतील आरोपी आहेत. आरोपी अटक नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास फिर्यादी किरण हे त्यांची फॉर्च्यूनर गाडी शेडमध्ये पार्क करुन रस्ता ओलांडत होते.  त्यांच्या घराजवळ आरोपींनी त्यांना मारण्याच्या उद्देशाने मारुती स्विफ्ट कार त्यांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न केला. 

आरोपींविरोधात उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०९ (१), ११८ (१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories