केशवनगर-चिंचवड येथे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, ता. ८ - तडीपार आदेश आणि शस्त्र बाळगण्यास मनाई आदेशाचा भंग करुन ५५ हजार रुपयांचेद देशी बनावटीची पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (ता. ७) केशवनगर-चिंचवड येथून अटक केली आहे.
आरोपी विजय राजू काळे (वय २७ वर्षे, मजुरी, रा. पत्राशेड लिंक रोड, चिंचवड) याला सन २०२४ मध्ये पुणे जिल्हयाच्या हद्दीतून २ वर्षे कालावधीसाठी तडीपार केले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत शारीरिक इजा करता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई आदेश लागू आहे. या दोन्ही आदेशांचे उल्लंघन करुन आरोपीने अवैधरित्या, विनापरवाना ५५,०००/- रुपये किंमतीची एक देशी बनावटची पिस्तूल व २०००/- रुपये किंमतीचे एक काडतूस बाळगले होते. केशवनगर-चिंचवड येथे नाल्यालगत तो पिस्तूलासह सापडला. त्याच्या जवळचे पिस्तूल पोलिसांनी जप्त करुन त्याला अटक केली आहे.
आरोपीवर चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियम १९५९ चे कलम कलम ३, २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२, ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
- भारतीय हत्यार प्रतिबंध अधिनियम, Arms Act India, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, Maharashtra Police Act,
- डीपार आदेश, Exile Order, बंदी आदेश, Prohibition Order
- पोलिस कारवाई, Police Action, अवैध शस्त्र, Illegal Weapon,
- देशी बनावटी पिस्तूल, Desi Pistol, जिवंत काडतूस, Live Cartridge,
- केशवनगर, Keshavnagar, चिंचवड, Chinchwad, पिस्तूल, Pistol, तरुण, Youth, अटक, Arrest