news
clock
फसव्या आर्थिक व्यवहारात कंपनी मालकाला तब्बल ७० लाख रुपयांना गंडा

फसव्या आर्थिक व्यवहारात कंपनी मालकाला तब्बल ७० लाख रुपयांना गंडा

 फसव्या आर्थिक व्यवहारात कंपनी मालकाला तब्बल ७० लाख रुपयांना गंडा

पिंपरी, ता. २५ - एका कंपनीतील अकाउंटंटला कंपनीचा मालकच संवाद साधत असल्याचे भासवून एकाने कंपनीच्या मालकाला तब्बल ७० लाख रुपयांना गंडा घातला आहे.  ही घटना रावेत येथील ए.व्ही.एच. ग्लोबल फार्मस प्रा.लि. कंपनीत १५ एप्रिल २०२६ रोजी घडली आहे. याबाबत तीन आरोपींविरोधात सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, कंपनीच्या मालकाने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्हॉट्सअॅप धारक व दोन बॅंकखातेधारक आरोपी आहेत. आरोपींनी  फिर्यादीच्या कंपनीचा अकाऊंटंट मनोज सपकाळ याच्या व्हॉट्सअॅपवर फिर्यादीच्या प्रोफाईलवरील डीपी व नावाने व्हॉट्सअप मॅसेज केला. हे मेसेज फिर्यादीच करत असल्याचे भासवले व बॅंकखात्यावर ७० लाख रुपये भरण्यास भाग पाडले. यानंतरही  व दुसऱ्या खात्यावर ३० लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, वेळीच हा फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्याने फिर्यादीच्या अकाउंटंटने ही रक्कम भरली नाही.  या खोट्या व्यवहारात कंपनीच्या मालकाची  ७०,००,०००/- रुपयांची फसवणूक झाली आहे. 

आरोपींविरोधात सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (सी), ६६ (डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories