news
clock
नोकरीच्या अमिषाने युवकाला ७ लाख ८० हजार रुपयांना गंडा

नोकरीच्या अमिषाने युवकाला ७ लाख ८० हजार रुपयांना गंडा

नोकरीच्या अमिषाने युवकाला ७ लाख ८० हजार रुपयांना गंडा

पिंपरी, ता. २२ - लातूरमधून पुण्यात आलेल्या २३ वर्षीय युवकाला नोकरीच्या अमिषाने एकूण ७ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२५ ते एप्रिल  २०२६ पर्यंत  हिंजवडी येथील गेरा इम्पेरीयर कंपनीमध्ये घडली आहे. पांडुरंग पदमाकर केंद्रे (वय २३ वर्षे, नोकरी रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी, मूळ पत्ता - जि. लातूर) असे फसवणूकीला बळी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 

पांडुरंगने पोलिसांत तक्रार दिली आहे.  त्यानुसार अॅक्युअर सॉफ्टटेक प्रा.लि. गेरा इम्पेरीयरचे संचालक अमोल बाळासाहेब महाडीक व ओमकार दादासो महाडीक यांना पोलिसांनी अटक केली आहे. विविध कन्सल्टंसीही यात आरोपी आहेत.

 आरोपींनी आपसांत संगनमत करुन फिर्यादी पांडुरंग व साक्षीदारांकडून कंपनीच्या खात्यावर तसेच विविध कंसल्टन्सीच्या मार्फतीने पैसे घेतले. त्यांना ट्रेनींग देऊन, काम करुन घेऊन, कोणतेही प्रोजेक्ट न देता वेगवेगळी कारणे देऊन त्यांचा विश्वासघात करुन फसवणूक करुन ती रक्कम स्वःतासाठी वापरली.  फिर्यादी पांडुरंगने नोकरीसाठी भरलेले पैसे आरोपीकडे परत मागितले असता त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांनी इतर कंपन्यामध्ये नोकरी लाऊ शकतो असेही आमिष दाखवून त्या कंपनीचे एंजट असल्याचे सांगत  कमिशन वजा डिपॉझीट घेतले आहे अशी बतावणी केली. आता सदर कंपनीचे ऑफिस बंद आहे. या प्रकारात  युवकाची एकूण ७,८०,०००/- रुपयांची फसवणूक झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

तपासात आणखी काही आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. आरोपींविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३१६ (५), ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories