news
clock
नाशिकमधील दोन विद्यार्थिनींची 'एनडीए'साठी निवड

नाशिकमधील दोन विद्यार्थिनींची 'एनडीए'साठी निवड

नाशिकमधील दोन विद्यार्थिनींची 'एनडीए'साठी निवड 

पुणे, ता. २३ - नाशिक येथील मुलींच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था या केंद्रातून राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) साठी दोन विद्यार्थिनींची अंतिम निवड झाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये जिया सचिन करपे हिने मुलींमध्ये अखिल भारतीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर समृद्धी प्रविण इंगळे हिने १५ वा क्रमांक पटकावला आहे. दोन्ही विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन आहे. 

नाशिकमधील हे केंद्र भविष्यात अधिकाधिक विद्यार्थिनींना सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी प्रेरित करेल, असा विश्वास मंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories