news
clock
राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

 राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती 

पावसाच्या अनियमतेतमुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी जपून वापरण्याचे जनतेला आवाहन 

पुणे, ता. २३ - राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती बुधवारी (ता. २२) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी होता. मात्र यंदा 'एल निनो' परिस्थितीच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली. एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात सन २०१४ मध्ये १२ टक्के तर सन २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी तर याच दिवशी सन २०१५ ला ६२५ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत सन २०२५ मध्ये १५ ऑक्टोबरला १३३०.९७ टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा २१ एप्रिल २०२६ रोजी ६५३.६३ टीएमसी आहे.

 गतवर्षीच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १०१.७७ टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करुन ऑगस्ट २०२६ अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केले.

राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा आकडेवारी ('टिएमसी'मध्ये)  –

- कोयना : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - ३३.६२, गतवर्षीचा पाणीसाठा - ३६.७६ 

- जायकवाडी : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - ४२.०३, गतवर्षीचा पाणीसाठा - ३४.४४

- उजनी : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - १३.३९, गतवर्षीचा पाणीसाठा - (०) 

- पेंच प्रकल्प समूह : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - २६.५७, गतवर्षीचा पाणीसाठा - २६.३५. 

- इसापूर : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - २१.४५, गतवर्षीचा पाणीसाठा - १७.८२

- भातसा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - १५.७०, गतवर्षीचा पाणीसाठा - १४.९१

- गोसीखुर्द : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - १४.३१, गतवर्षीचा पाणीसाठा - ५.९३

-  खडकवासला धरण समूह : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - ११.३२, गतवर्षीचा पाणीसाठा -९.८२

- मुळा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा -  ९.५४, गतवर्षीचा पाणीसाठा - १०.५३

- अप्पर वर्धा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - १०.२१,  गतवर्षीचा पाणीसाठा - ९.५३

- अप्पर वैतरणा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - ६.५२, गतवर्षीचा पाणीसाठा -  ५.९५

-  भंडारदरा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा - ५.२५,  गतवर्षीचा पाणीसाठा -६.०४ टिएमसी



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories