news
clock
पैसे कमवण्याच्या आमिषाला बळी पडून  ४७ वर्षीय गृहिणीची तब्बल  २४ लाख २८ हजारांची फसवणूक

पैसे कमवण्याच्या आमिषाला बळी पडून ४७ वर्षीय गृहिणीची तब्बल २४ लाख २८ हजारांची फसवणूक

 पैसे कमवण्याच्या आमिषाला बळी पडून  ४७ वर्षीय गृहिणीची तब्बल  २४ लाख २८ हजारांची फसवणूक 

पिंपरी, ता. २३ - पैसे कमवण्याचे आमिष दाखवून करुन घेतलेल्या आर्थिक व्यवहारात वाकड येथील एका ४७ वर्षीय गृहिणीची तब्बल  २४ लाख २८ हजार ९८७ रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना ३० ऑक्टोबर २०२५  ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. याबाबत तीन आरोपींविरोधात सोमवारी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फसवणूकीला बळी पडलेल्या महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमिका व लायला शर्मा नावाच्या महिला व  रजत बाळाकृष्णन (पुर्णनाव पत्ता वय माहिती नाही) हे या घटनेतील आरोपी आहेत. आरोपींनी  फिर्यादी महिलेला व्हॉट्स अॅप वरुन "एच. आर. मेगा इंडिया लिमिटेड" कडून पैसे कमावण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी महिलेस टेलीग्रामवर टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली वेळोवेळी रक्कम भरण्यास प्रवृत्त केले.

 फिर्यादी महिलेने विश्वास ठेवून विविध बँक खात्यांवर एकूण रुपये २४, २८,९८७.२०/- रक्कम पाठविली. नंतर आणखी  २३ लाख रुपये भरण्याची मागणी झाल्यावर फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. 

आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींवर बुधवारी (ता. २२) वाकड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९ (२), ३ (५) माहिती तत्रज्ञान अधिनियम २००० चेकलम ६६ डी नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories