दहावीचा महाराष्ट्राचा निकाल ९२.०९ टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, पुणे विभागाचा निकाल ९४.२४ टक्के

दहावीचा महाराष्ट्राचा निकाल ९२.०९ टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, पुणे विभागाचा निकाल ९४.२४ टक्के

दहावीचा महाराष्ट्राचा निकाल ९२.०९ टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, पुणे विभागाचा निकाल ९४.२४ टक्के 

पुणे, ता. ८ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे.

 राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख २० हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदाच्या निकालातही विद्यार्थिनीच आघाडीवर आहेत. विद्यार्थ्यांना दुपारी १ नंतर ऑनलाइन माध्यमातून आपला निकाल पाहता येईल.  

राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्यभरातून एकूण १५ लाख ५५ हजार २६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यामधील १५ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ८९.५६ टक्के, तर मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला आहे. 

विभागनिहाय निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के लागला आहे आणि सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा  ८८.४१ टक्के इतका लागला आहे. 

विभागनिहाय निकालाची टक्केवारी - 

- कोकण विभाग - ९७.६२ टक्के 

- पुणे विभाग - ९४.२४ टक्के

- मुंबई विभाग - ९४.९७ टक्के

- नागपूर विभाग - ८९.०७ टक्के

- छत्रपती संभाजीनगर - ८८.४१ टक्के

- कोल्हापूर विभाग - ९५.४७ टक्के

- अमरावती विभाग - ९०.५०टक्के

- नाशिक विभागाचा - ९०.५३ टक्के

- लातूर विभागाचा - ८८.४२ टक्के 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories