अकरावीची प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरी आणि पहिल्या नियमित कॅप फेरीचे वेळापत्रक जाहीर
अकरावीची प्रवेश प्रक्रियेतील शून्य फेरी आणि पहिल्या नियमित कॅप फेरीचे वेळापत्रक जाहीर
पुणे, ता. ९ - दहावीचा निकाल काल, शुक्रवारी (ता. ८) ऑनलाईन जाहीर झाला. त्यानंतर, राज्यातील नऊ हजार ५८९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सुमारे साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरुन नोंदणी केली आहे. अकरावीच्या प्रवेशाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी १४ आणि १५ मे दरम्यान, तर अंतिम गुणवत्ता यादी १८ आणि १९ मे दरम्यान जाहीर होणार आहे. तर पहिल्या नियमित कॅप फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ जाहीर २६ मे रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेची शून्य फेरी आणि पहिल्या नियमित कॅप फेरीचे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केले आहे.
वेळापत्रकानुसार, सोमवारपासून (ता. ११) अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया 'https://mahafyjcadmissions.in'या अधिकृत संकेतस्थळावरुन करायची आहे. प्रवेश अर्जचा भाग एक आणि भाग दोन भरायचा आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरिता विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. प्रवेशाची नियमित कॅप आणि कोट्याअंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया एकाच वेळी सुरु राहणार आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक असे....
शून्य प्रवेश फेरी :
- विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग एक ऑनलाइन सादर करणे : १० मे पर्यंत
- शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग एक आणि दोन सादर करणे, महाविद्यालयांचा प्राध्यान्यक्रम निवडणे : ११ ते १३ मे
- तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : १४ ते १५ मे दरम्यान
- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे, हरकतीचे निवारण करणे : १६ मे
- सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे : १८ ते १९ मे
- रिक्त जागांचा तपशील प्रदर्शित करणे, पहिल्या नियमित फेरीसाठी जागा प्रदर्शित करणे : २० मे
- पहिली नियमित 'कॅप' फेरी
- नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जाचा भाग एक आणि दोन भरणे, महाविद्यालयांचा प्राध्यान्यक्रम नोंदविणे : २१ आणि २२ मे
- अलॉटमेंट प्रक्रिया : २३ ते २६ मे
- पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी, महाविद्यालय वाटप यादी, कट-ऑफ जाहीर करणे : २६ मे
- वाटप केलेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी मुदत, प्रवेश नकारणे, प्रवेश रद्द करणे : २६ ते २८ मे
- रिक्त जागांचा तपशील प्रदर्शित करणे : २९ मे
- दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे : ३० मे