पिंपरी | २५ सप्टेंबर २०२६ : माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करून कामगार चळवळीला नवी दिशा देणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक तथा माथाडी कामगारांचे भाग्यविधाते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. चिंचवड येथील के. एस. बी. चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्याला उजाळा देण्यात आला.
यावेळी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना केवळ हक्क मिळवून दिले नाहीत, तर त्यांच्या श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा आणि कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी उभारलेली चळवळ आजही लाखो कामगारांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या विचारांची आणि कार्याची जपणूक करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
माथाडी कामगारांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि कामगार कल्याणासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अण्णासाहेब पाटील यांनी उभारलेली कामगार चळवळ ही केवळ एका समाजाची किंवा घटकाची नसून कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहर पुणे जिल्हाध्यक्ष हनुमंत तरडे, पुणे जिल्हा संघटक प्रदीप धामणकर, मारुती अप्पा कवदरे, नागेश वनवटे, रवि गोडेकर, सर्जेराव कचरे, अशोक साबळे, सुरेश ठीक, अविनाश भोसले, संदीप जांभळे, रोहित नवले, युवराज पोतेकर, अजय भोर, किरण देवकर, गणेश देवडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, विविध माथाडी टोळ्यांचे मुकादम आणि