news
clock
अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील गणपती मंदिर भाविकासांठी १० मे ते ९ जूनपर्यंत पूर्णतः बंद राहणार

अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील गणपती मंदिर भाविकासांठी १० मे ते ९ जूनपर्यंत पूर्णतः बंद राहणार

अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील गणपती मंदिर भाविकासांठी १० मे ते ९ जूनपर्यंत पूर्णतः बंद राहणार 

पुणे, ता. ९ - अष्टविनायक गणपती मंदिरांच्या जतन, देखभाल आणि संवर्धनाचे काम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारीत येणारी 'श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक' ही तीन मंदिरे '१० मे ते ९ जून २०२६' या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत.

पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून या मंदिरांचे नूतनीकरण केले जात आहे.  सध्या मुख्य मंदिर आणि परिसरातील दगडी बांधकामाचे जतन व संवर्धनाचे काम केले जात आहे. मंदिर दर्शनासाठी खुले ठेवल्यास भक्तांच्या सततच्या वावरामुळे कामात अडथळा निर्माण होऊ शकतो.  कामाचा कालावधी वाढू शकतो. त्यामुळे,नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी ही मंदिरे भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.

बंद काळात श्रींची नित्य पूजा, अर्चा आणि इतर धार्मिक विधी परंपरेनुसार सुरु राहणार आहेत. मंदिर परिसरात केवळ पुजारी, संवर्धन कामाची यंत्रणा, अधिकृत कर्मचारी आणि विश्वस्त यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सर्व गणेश भक्त, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांना या कामाचे महत्त्व ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन  चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी केले आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories