news
clock
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेबाबत पुनर्विचार व्हावा, वैद्यकीय क्षेत्रातून आग्रही मागणी

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेबाबत पुनर्विचार व्हावा, वैद्यकीय क्षेत्रातून आग्रही मागणी

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेबाबत पुनर्विचार व्हावा, वैद्यकीय क्षेत्रातून आग्रही मागणी

पुणे, ता. २० - पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेसाठी सर्वांत आधी मागणी करुनही स्वायत्ततेच्या यादीतून महाविद्यालयाला डावलले आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.  बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाली तर महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या कामकाजात मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेबाबत पुनर्विचार व्हावा, अशी आग्रही मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे. 

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील व देशातील एक ऐतिहासिक आणि नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. इथे, सध्या सुमारे दीड हजार विद्यार्थी एमबीबीएस आणि पदव्युत्तर शिक्षण घेतात. हे महाविद्यालय ससून रुग्णालयाशी जोडले आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य सेवांमध्ये परिणाम होणार आहेत. 

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय स्वायत्त झाल्यास महाविद्यालय महत्त्वाचे निर्णय स्वतः घेऊ शकते. 

महाविद्यालयाला शैक्षणिक, प्रशासकीय निर्णय घेता येतील. एखाद्या कामासाठी शासनदरबारी प्रस्ताव पाठवण्याची गरज पडणार नाही, गरजेनुसार नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम किंवा सुपर स्पेशालिटी कोर्स सुरु करता येतील. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रगत शिक्षण मिळू शकते, रुग्णालय आणि महाविद्यालयातील डॉक्टर, प्राध्यापक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकर भरता येतील. त्यामुळे रुग्णसेवा सुधारू शकते, वैद्यकीय सेवा बळकट झाल्याने मध्यमवर्गीय रुग्णही सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यास प्राधान्य देऊ शकतील, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. त्यामुळे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयास स्वायत्ततेचा दर्जा मिळणार का, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

स्वायत्ततेबाबत पुनर्विचार होणे आवश्यक

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुण्यात जरी असले, तरी स्पर्धात्मक परीक्षेतून भारतभरातले विद्यार्थी तिथे येत असतात. महाविद्यालयामधील शिक्षणाचा दर्जा अत्युत्तम आहे, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील रुग्ण तिथे उपचाराला येत असल्याने, विद्यार्थ्यांना व्यापक अनुभव मिळतो. वैद्यकीय शिक्षणात स्वायत्तता आल्यास दर्जामध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वायत्ततेबाबत पुनर्विचार होणे आवश्यक आहे.

- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल एसोसिएशन, महाराष्ट्र

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories