news
clock
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून १६८ अतिरिक्त विशेष गाड्यांचे नियोजन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून १६८ अतिरिक्त विशेष गाड्यांचे नियोजन

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून १६८ अतिरिक्त विशेष गाड्यांचे नियोजन, पुणे व मुबंईतून सुटणार गाड्या


पुणे, ता. १५ - शहारातून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी गावी जाताना नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वे १६८ अतिरिक्त विशेष गाड्या सोडणार आहे.  मुंबई आणि पुणे येथून या मुख्य रेल्वेस्थानकांवरुन देशातील विविध प्रमुख शहरांकडे या गाड्या धावणार आहेत. या विशेष गाड्यांपैकी काही गाड्यांचे बुकिंग सुरु झाले आहे. उर्वरित गाड्यांसाठी १५ एप्रिलपासून आरक्षण उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच रेल वन अॅपद्वारे तिकीट बुकिंग व वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

सुट्टीसाठीच्या या विशेष गाड्यांमध्ये, सीएसएमटी ते चेन्नई, हैदराबाद,  लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस, संतरागछी आणि बंगळूर या महत्त्वाच्या मार्गावर साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि विशेष फेऱ्या असतील. पुणे ते गाझीपूर शहर आणि संतरागछी दरम्यान विशेष गाड्या उपलब्ध आहेत.  लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस मार्गावर  ७ मे ते १५ जुलै या कालावधीत द्विसाप्ताहिक गाड्या धावतील.  ६ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून आणि १२ जूनला बनारसहून 'शिक्षक विशेष' गाडी चालवण्यात येणार आहे. 

मुंबई-हैदराबाद आणि मुंबई-चेन्नई मार्गावर एप्रिल ते जुलै या कालावधीत साप्ताहिक विशेष गाड्या सोडल्या जातील. बंगळूर आणि संतरागछी या लांब पल्ल्याच्या मार्गावरही अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे. बहुतांश गाड्यांमध्ये वातानुकूलित तसेच सामान्य श्रेणीतील डबे उपलब्ध असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories